![]() |
नानीमॉं दर्ग्यामध्ये पालकमंत्री ना. चव्हाण नानीमॉंच्या समाधीवर चादर चढविताना |
नळदुर्ग -: येथील सरकार नानीमॉं (हजरता सय्यदा खैरुन्नीसा बेगम साहेबा) यांचे 38 वे उरुस मोठ्या उत्साहाने शनिवारपासून सुरु झाले असून रविवार दि. 16 जून रोजी सकाळी दहा वाजता उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी दर्ग्यास भेट दिली. उरुसनिमित्त आयोजित रक्तदान शिबीराचे उदघाटन ना. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
अस्मिता विश्वस्त मंडळ गुंजोटी (ता. उमरगा) आयोजित श्रीकृष्ण रक्तपेढी उमरगा यांच्यावतीने रक्तदान शिबीराचे नानीमॉं उरुसानिमित्त आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते फित कापून उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी नगराध्यक्ष शब्बीरअली सय्यद सावकार, प्रा. जावेद काझी, अख्तर काझी आदीजण उपस्थित होते. प्रारंभी पालकमंत्र्यानी दर्ग्यामध्ये जावून नानीमॉच्या समाधीवर चादर चढवून दर्शन घेतले. त्यानंतर दर्गाह कमिटीच्यावतीने रिजवानउल्ला काझी यांनी ना. चव्हाण यांच्या हस्ते शाल, पुष्पहार घालून सत्कार केला. यावेळी हजरत शेख, सिकंदर काझी, वसीम शेख यांच्यासह भक्त व नागरीक उपस्थित होते.