नांदेड -: येथील महावीर सोसायटीतील नरसिंह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शालांत प्रमाणपत्र परीक्षेतून विशेष प्राविण्य मिळविलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून महाविद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला.
इयत्ता दहावीतील अभंगे संभाजी 82 टक्के, संदेश चौरे 81 टक्के, शुभम पट्टेकर 79 टक्के तर इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेले कु. गोदावरी उंदरे 69 टक्के, कु. अंजली कावळे 65 टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष शिवाजी जाधव व नगरसेवक बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी प्राथमिक शाळेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शाळेच्या पहिल्याच दिवशी गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय पाठ्यपुस्तके व गणवेश पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सौ. एस.पी. उन्हाळे यांनी तर सूत्रसंचालन मुख्याध्यापक सी.एम. चौधरी यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.