नळदुर्ग -: चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडून रेशनचे वाटप शासकीय नियमाप्रमाणे होत नसून लाभार्थी शिधापत्रिका धारकावर एकप्रकारे अन्याय होत आहे. तेंव्हा सदर संबंधित रेशन दुकानदाराची चौकशी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी लेखीनिवेदनाद्वारे तुळजापूर तहसिलदाराकडे करण्यात आली आहे.
याबाबत रिपाइंचे तालुका संघटक विलास गायकवाड चिकुंद्रा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत गायकवाड यांनी तुळजापूर तहसिलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, चिकुंद्रा येथील स्वस्त धान्य दुकानदार हे लाभार्थी शिधापत्रिका धारकाना धान्याचे गहू, तांदूळ व रॉकेलचे वाटप शासकीय नियमाप्रमाणे न करता एक-दोन दिवस रेशन व रॉकेल वाटप केल्याचे दर्शवून लगेचच रेशन संपल्याचे सांगून उर्वरित धान्य व रॉकेल राजरोसपणे काळ्या बाजारात विकत आहे. अंत्योदयोय व बीपीएल कार्ड धारकाना त्यांचा नियमित कोटा मिळत नाही. तेंव्हा संबंधित अधिका-यानी सदर दुकानदाराची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्याची मागणी त्यानी लेखी निवेदनाद्वारे तहसिलदाराकडे केली आहे.
वास्तविक पाहता, तुळजापूर तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदारांच्या बाबतीत असा प्राकर घडतो. पण तोंड दाबून बुक्कीचा मार सहन केल्याप्रमाणे शिधापत्रिका धारकांना हा अन्याय सहन करावा लागतो. गावातील काही बगल बंच्याना दुकानदार व्यवस्थित सांभाळून त्याना अधिक रेशन व रॉकेल देवून आपली बचावात्मक बाजू भक्कम करुन सर्वसामान्यावर अन्याय करीत असल्याचे बोलले जात आहे.