उस्मानाबाद :- महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत उत्कृष्ट वार्तांकन व लेख लिहिणा-या पत्रकारांसाठी पुरस्कार योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी दि. १५ जूनपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पुरस्कारासाठी २ मे २०१२ ते १ मे २०१३ या कालावधीत प्रसिद्ध झालेले साहित्य पुरस्कार पात्रतेकरिता ग्राह्य धरण्यात येईल.
जिल्हास्तरावरील पुरस्कारासाठी या संबंधीचे निकष पूर्ण करणाञ पात्र पत्रकारांनी विहित नमुन्यातील प्रवेशिका तीन प्रतीत सर्व कागदपत्रे व कात्रणांसह १५ जूनपर्यंत जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, पहिला मजला, कक्ष क्र. २८, उस्मानाबाद येथे पाठवावी, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे सदस्य-सचिव दीपक चव्हाण यांनी केले आहे.
पारितोषिकासाठी विहित मुदतीत केलेले अर्जच विचारात घेतले जातील. एका वर्तमानपत्राच्या प्रत्येक आवृत्तीच्या एकाच पत्रकाराचा संपादकांनी शिफारस केलेला अर्ज स्वीकारण्यात येईल.