मुंबई -: काही दिवसांपूर्वी तेजीच्या वारूवर स्वार असलेले सोने गेल्या तीन दिवसांत 2000 ते 2500 रुपयांनी स्वस्त झाले आहे. जागतिक घडामोडींनी या मौल्यवान धातूचा तेजीचा रथ रोखला. दोन महिन्यांपूर्वी तोळ्यामागे 30 ते 31 हजारांच्या कक्षेत फिरणारे सोने शुक्रवारी 25,650 रुपयांपर्यंत खाली आले. सोन्याचा हा 23 महिन्यांचा नीचांक आहे. तसेच शुद्ध सोने प्रति १0 ग्रॅम २५२६५ रुपये पातळीवर बंद झाले. सोन्याप्रमाणे चांदीदेखील २६0 रुपये घसरून प्रतिकिलो ४0१९0 रुपये पातळीवर बंद झाली.
    अमेरिकी फेडरल रिझर्व्हने रोखे खरेदीचा हात आखडता घेण्याचे दिलेले संकेत आणि केंद्राच्या सोन्यावरील निर्बंधांमुळे मागणी घटली. शुक्रवारी दिल्लीत सोन्याची प्रचंड विक्री झाली. गुंतवणूकदार शेअर्सकडे वळल्याने सोन्याला फटका बसत आहे. जागतिक बाजारात सोन्याने 3 वर्षांचा नीचांक गाठला. सिंगापूरमध्ये सोने औंसमागे (28.35 ग्रॅम) 24.40 डॉलरनी घसरून 1200.80 वर आले.
    ल्ली आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या दरातील घसरणीचा परिणाम स्थानिक बाजारपेठांवर नेहमीच होत असतो. अमेरिकेत महागाईविरोधात संरक्षण म्हणून सोन्यात गुंतवणूक होणार नाही, असे संकेत मिळाल्याने तेथील गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक काढून शेअरमध्ये गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळे जागतिक बाजारात देखील सोन्याचा भाव कोसळला. अमेरिकेच्या बाजारात तर सोन्याचा भाव प्रतिऔंस (३१ ग्रॅम) २४.४ डॉलर्स कोसळून १२00.८0 डॉलर्स प्रतिऔंस असा नोंदला गेला. याचा परिणाम देखील भारतीय सराफा बाजारावर मोठय़ा प्रमाणात झाला.
 
Top