बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: माझा अंगाचा साबण का वापरला, असे म्हणत घरात ठेवलेल्या तेरा वर्षाच्या मुलीच्या अंगावर उकळते पाणी टाकून जखमी केल्याची चित्तथरारक घटना शुक्रवारी रात्री सात वाजण्याच्या दरम्यान बार्शीतील वाणी प्लॉट येथे घडली. यामध्ये ज्योती सुरवसे या तेरा वर्षाच्या मुलीला गंभीर जखमा झाल्या आहेत. सदरच्या घटनेचा जबाब देण्यावेळी धमकी दिली त्यामुळे उलट जबाब नोंदविल्याचे तिच्या वडिलांनी बोलताना सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, बांधकामाला लागणा-या खडीचा व्यवसाय असलेल्या बाळासाहेब पाटील यांच्याकडे दत्ता नामदेव सुरवसे हा कर्मचारी कामाला असून त्याला सहा मुली आहे. मुलींचे प्रमाण जास्त असल्याने सुरवसे हा प्रपंचाचा रहाटगाडा चालविण्यात कमकुवत असल्याचा गैरफायदा घेत दत्ता सुरवसे यांच्या सहा मुलीपैकी ज्योती या मुलीला आपल्याकडे सोडा मी तिला माझ्या मुलीप्रमाणे सांभाळतो, आमच्याकडे नवरा-बायकोशिवाय कोणी नाही, असे बाळासाहेब पाटील यांनी विनंती केली. त्यानुसार ज्योती ही बाळासाहेब पाटील यांच्याकडे राहू लागली. शुक्रवारी बाळासाहेब पाटील व त्यांची पत्नी राजश्री पाटील यांच्यात भांडण झाले. राजश्री पाटील यांनी घरात सांभाळ करण्यासाठी ठेवलेल्या मुलीला माझे अंगाचे साबण का घेतले, असे म्हणून मारहाण करुन उकळलेले पाणी अंगावर टाकून जखमी केले. सदरच्या घटनेनंतर तिला उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी घरातच डांबून ठेवण्यात आले. दुस-या दिवशी तिला येथील हिरेमठ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले व यानंतर तिच्या वडिलांना सदरचा प्रकार समजला. यावेळी अगदी किरकोळ भाजले असल्याचे सांगण्यात आले. यानंतर सुरवसे यांनी तडकाफडकी दवाखान्यात येऊन पाहिले. यावेळी त्यांना बाळासाहेब पाटील यांनी बाहेर बोलावून धमकी देवून मला पाहिजे तसा जबाब दिला तर खर्च करतो आणि वर काही पैसे देतो, नाहीतर तुमच्या परिवाराचे काही खरे नाही, असे धमकावल्याने त्यांनी उलट जबाब दिला. यानंतर मुलीला आपल्या परिवाराचे काही खरे नाही, त्यांना हवे तसा जबाब दे असे वडिलांनी सांगितले. सदरच्या प्रकारानंतर दवाखान्यात उपचार सुरु झाले, पंरतु बाळासाहेब पाटील यांनी आता मी काही खर्च करणार नसल्याचे तसचे भेट घेत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुरवसे यांनी नातेवाईकाना सदरचा प्रकार सांगितला. सदरच्या घडलेल्या प्रकाराची सत्य माहिती आता पोलिसांपुढे सांगण्यात येणार व त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची विनंती करणार असल्याचे सुरवसे यांनी नातेवाईकांसमोर सांगितले. तपासकानी असलेल्या पोलिसांना सदरचा प्रकार समजला असूनही त्यांनी समयसूचकता अथवा गांभिर्याने प्रकाराची दखल न घेता मूग गिळून गप्प बसण्यातच समाधान मानले.