
मल्हार सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांच्या आदेशानुसार या संघटनेचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष धनाजी सातपुते यांनी बंदीछोडे यांना सदर निवडीचे पत्र दिले असून सामाजिक कार्यात सक्रिय राहून संघटना बांधणीच्या कामी योगदान द्यावे, याकरीता आपली निवड दोन वर्षासाठी करण्यात येत आहे, असे निवड पत्रात नमुद करण्यात आले आहे.
बंदीछोडे यांच्या निवडीबद्दल निलेगाव येथे कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. तर ग्रामस्थांच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते बसवराज जमादार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.