उस्मानाबाद -: राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने पंढरपूर आषाढी यात्रेनिमित्त संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दिंडीत वारकऱ्यांना व ग्रामस्थांना निर्मल भारत अभियानांर्गत स्वच्छतेविषयी प्रबोधन करण्यासाठी जिल्हयातून 6 व्यक्तीचे कलापथक, कलाकारांची निवड दि. 29 जुन रोजी सकाळी 11 वाजता येथील कै यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात येणार आहे.
इच्छुक कलावंत व पथकांनी त्यांच्या संचातील कलाकारांच्या विविध कलेतून स्वच्छतेविषयक उत्कृष्ट प्रबोधन सादरीकरणासाठी आपल्या वादयवृंद साहित्यासह कार्यशाळेत सहभाग घ्यावा,असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे.
स्वच्छता दिंडीसाठी कलापथकाची निवड केल्यानंतर दिंडी कालावधीचे प्रतिदिन प्रती व्यक्ती एक हजार रुपये एवढे मानधन दिंडी पुर्ण झाल्यानंतर देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन (कक्ष), जिल्हा परिषद, उस्मानाबादशी (मोबाईल क्रमांक-9850981451) संपर्क साधावा.