नळदुर्ग -: शहरात चोरटयानी गेल्या काही दिवसांपासून घर तसेच दुकाने फोडण्याचे सत्र चालू ठेवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ या चोरटयांचा बंदोबस्त करावा व शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे.
सध्या पावसाने मोठी दडी मारली आहे. त्यामुळे सलग दुस-या वर्षी तुळजापूर तालुक्यावर भीषण दुकाष्ळाचे सावट निर्माण झाले आहे. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने नळदुर्ग शहर व परिसरात चो-यांच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नळदुर्ग शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरटयांच्या कारवायात वाढ झाली आहे. शहरातील शासकीय विश्रामगृहासमोरील परिसर तसेच व्यासनगर, वैष्णवनगर परिसरात चोरटे भलतेच सक्रीय झाले असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातील अनेक दुकाने व घरांमध्ये चोरी करुन माल लंपास केल्याच्या घटना घडल्या आहेत. चोरटयांनी केलेल्या चो-या पाहता, हे चोरटे भुरटे चोर असल्याचे दिसून येत आहे. कारण चोरटयांनी पाण्याच्या बाटल्या, कोल्डींग्स, घरातील तिखट असे सामान चोरुन नेले आहे. चो-यांच्या प्रमाणात वाढ झाली असल्याने शहरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी तात्काळ या चोरटयांचा बंदोबस्त करावा तसेच शहरात रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. चो-यांना आळा घालण्यासाठी पोलिसांबरोबर नागरिकांनाही सतर्क राहणे गरजेचे आहे.