बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाराष्ट्र विद्यालयात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून सदरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन करण्याऐवजी विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करुन गोंधळ निर्माण झाला. सदरच्या गोंधळामुळे शाळेच्या मुख्याधिपकांनी पोलिसांना बोलावले. यावेळी शाळेतील मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी सांगितलेल्या चुकीच्या सुचनांमुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने गोंधळात काही पालकांना पायी तुडवून पालक इकडेतिकडे सैरभैर धावत असल्याने पोलिसांना बेशिस्त पालकांवर नाईलाजास्तव सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
सदरचा प्रकार हा केवळ शिक्षक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या बेफिकीरीमुळे व ढिसाळ नियोजनामुळे घडला आहे. त्यांच्याकडून सदरच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अगोदर येईल त्यांनाच प्रवेश देण्यात येईल. तसेच काही जणांना अगोदरच्या रात्रीच नंबरसाठी थांबविण्यात आले. महिला व पुरुष पालकांनी मोठ्या संख्येनी रात्रभर जागरण करुन शाळेच्या गेटबाहेर रात्र काढली. नेहमीच्या ऐटीप्रमाणे मुख्याध्यापिका आणि शिक्षक रोजच्यापेक्षा उशीराने शाळेत आले. तोपर्यत पालक एका ओळीमध्ये ताटकळत बसले होते. शिक्षकांनी अत्यंत शिस्तीच्या पध्दतीत फॉर्म विक्रीचे साहित्य टेबल, खुर्च्या इत्यादीची निवांतपणे मांडणी केली. ऐनवेळी मुख्याध्यापिकेचे मुड बदलला आणि त्यानी आदेश काढून माईकवर अनाऊंस केले की, तुम्या या गेटऐवजी त्या गेटवर या आणि माईकवर ऐकून पलाक मिळेल त्या वेगात दुस-या गेटकडे धावू लागले. तिकडे जवळपास पोहोचले तोपर्यंत पुन्हा माईकवर इकडे नको तिकडच्या गेटवर या, असे पुन्हा वेगळेच सांगिले. सदरच्या प्रकाराने गोंधळलेल्या पालकांनी पुन्हा पूर्वीच्या गेटकडे धाव घेतली. सदरच्या गोंधळात काही पालक खाली पडले. त्यांच्या अंगावर तुडति इतर पालक पळत असल्याचे पाहून पोलिसांनी बेफान पळणा-या पालकांना आवर घालण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला. सदरचा प्रकार घडल्यानंतर ज्यांनी रात्री जागरण करुन पहारा ठेवून ताटकळत नंबर लावले, त्यांच्याऐवजी सकाळी आयत्या वेळेवर आलेल्या पालकांना पहिल्या रांगेत उभे राहून फॉर्मचे वाटप करण्यात आले. निष्काळजीपणा, दिशाहीन, बेशिस् शिक्षकांनाच शिस्त लावण्याची गरज असल्याने अशा शाळेत नेहमीच असे प्रकार घडत असून पालकांना मात्र वेगळेच अनुभव येत आहेत.