तुळजापूर -: येथील शिवाजी चौकातील शिवनेरी लॉज येथे एकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. नितीन विठ्ठलराव सूर्यवंशी (39, रा. लातूर) हा शिवनेरी लॉज येथे रुम नं. 201 मध्ये राहण्यासाठी थांबला होता. त्याची राहण्याची मुदत दि. 5 जून रोजी सकाळी 8 वाजता संपत असल्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, आतून कोणताही आवाज न आल्याने दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. नितीन सूर्यवंशी हा विषारी औषध पिऊन बिछान्यावर मृतावस्थेत पडला होता. याप्रकरणी लॉज मॅनेजर उमाकांत जांबडे यांच्या फिर्यादीवरून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.