कळंब -: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेतलेल्या पदविका अभियांत्रिकीची उन्हाळी 2013 परीक्षेत राजर्षी शाहू इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाचा निकाल 87 टक्के लागला असून तृतीय वर्षातील यंत्र विभागचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. तसेच स्थापत्य आणि इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन या दोन विभागचा निकाल हा 90 टक्के लागला आहे. संस्थेतील प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
यंत्र अभियांत्रिकी विभागाचा सचिन जगन्नाथ शिवणकर (82.21 टक्के) याने संस्थेमधून सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तर द्वितीय क्रमांकार भाकरे श्रीधर (81.79 टक्के) व तृतीय क्रमांकावर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची गिता मुळीक (81.13 टक्के) हिने गुणप्राप्त केले. तसेच द्वितीय वर्षामध्ये प्रथम क्रमांकावर स्थापत्य विभागाचा कावळे श्रीकृष्ण महादेव (77.33 टक्के) याने गुणप्राप्त केले तर द्वितीय क्रमांकावर स्थापत्य विभगाची मोरे कोमल बबनराव 73.53 टक्के गुण संपादन केले व तृतीय स्थानी संगणक विभागाची भोसले प्रियंका याने हिने 69.94 टक्के मिळविले. तसेच प्रथम वर्षातील यंत्र अभियांत्रिकी जोगदंड शिवाजी याने 66.59 टक्के गुण संपादन करुन प्रथम येण्याचा मान मिळविला. तर द्वितीय क्रमांकावर स्थापत्य अभियांत्रिकी विभागाची राजमाने सरस्वती (63.87 टक्के) व यंत्र अभियांत्रिकी विभागाचा चव्हाण दत्तात्रय (63.29 टक्के) हा तृतीय आला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ए.डी. शेळके, सचिव सी.एन. भवर, प्राचार्य सत्येन शेळके यांच्यासह सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.