![]() |
पत्रे असे शेतात विखरुन पडल्याचे दिसत आहे. |
शहर व परिसराला बुधवार रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजता जोरदार विजेचा कडकडाट होवून वादळी वा-यासह पावसाने झोडपले. या झालेल्या वादळी वा-याच्या पावसामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले. काही भागात गारांचा पाऊस झाल्याचे बोलले जात असून खुदावाडी (ता. तुळजापूर) शिवारात असलेल्या बालक आश्रमावरील पत्रे उडून गेल्याने इमारतीच्या कक्षामध्ये असलेल्या अन्नधान्यासह पोषणपुरक आहार, कपडे, चादर, सतरंजी, फरशी असे मिळून सुमारे दोन लाख रुपयांचा नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याचबरोबर येडोळा पाटी ते नाईकनगर पाटी दरम्यान रस्त्याच्या कडेला शेतात असलेले पाच ते सात वीजेचा खांब पडले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. रात्री चांगला मोठा पाऊस झाल्याने परिसरातील शेतातील बांध, अरण, कट्टे फुटल्याची चर्चा शेतक-यात असून भोसगा (ता. लोहारा) येथील शेळ्या राखणारा इसम वीज पडून ठार झाला. दुष्काळाशी लढणा-या जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांना हा पाऊस दिलासा देणारा ठरला आहे. वादळी वा-यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पाणीपुरवठा पाणीपुरवठा करणारे पाण्याचे टँकर सर्वत्र चिखल झाल्यामुळे वाहतुक करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.
तुळजापूर तालुक्यासह सर्वत्र दि. 5 जून रोजी मान्सूनपूर्व वादळी वा-यासह पावसाचे जोरदार आगमन झाले. बुधवार रोजी सकाळ पासूनच कडाक्याचे ऊन पडल्याने वातावरणात कमालीचा उष्मा जाणवत होता. दुपारी चार वाजता अचानक नळदुर्ग शहरासह परिसरात सर्वत्र आकाशात ढग जामा झाले. त्यानंतर प्रचंड वादळी वारे झाले. पावसापूर्वी वागदरी शिवारात मोठमोठ्या गारा पडल्या. तुफानी वादळी वा-यात खुदावाडी गावांतर्गत येणा-या पाटीलतांडा येथील श्री सामकी माता मागासवर्गीय महिला बहुउद्देशीय ग्रामविकास संस्था संचलित जिजामाता बालकाश्रमावरील पत्रे उडून गेले. तर सिमेंटचे पत्रे फुटून जमीनदोस्त झाले. या घटनेत मुला-मुलींचे निवासांचे कक्ष, भोजन कक्ष, भांडार कक्षासह पाच रुमवरील जवळपास सव्वाशे पत्रे उडून गेले. पाच रुममध्ये असलेले साहित्य, ज्वारी, गहू, तांदूळ यासह पोषणपूरक आहार, अँगल, पत्रे, फरशी याचे प्रचंड नुकसान होवून भिंतीस मोठे तडे गेल्याचे दिसून आले. सुर्देवाने यावेळी पहारेकरी केशव नंदू राठोड, काळजीवाहक नागेश पवार या वादळी वा-यातून बचावल्याचे मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाचे अध्यक्ष प्रवीण पवार यांनी बोलताना सांगितले. तसेच सुट्टी असल्याने विद्यार्थी बालंबाल बचावले. या दुर्घटनेत बालकाश्रमाचे जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे संस्थाचालक राम पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर पाटील तांडा येथील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून जमीनदोस्त झाल्याने मोठे नुकसान झाले. तसेच परिसरातील किसन घोडके, बालेश्वर नाईक या शेतक-यांच्या शेतातील गोठ्यावरचे पत्रे उडाल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
नळदुर्ग परिसरात बुधवार रोजी झालेल्या पावसाची 40 मिलीमिटर एवढी नोंद झाली आहे. रात्री अकरा ते एक वाजण्याच्या दरम्यान जोरदार पाऊस झाले. नळदुर्गपासून जवळच असलेल्या भोसगा (ता. लोहारा) येथील विलास विठ्ठल कागे (वय 50 वर्षे) यांच्या अंगावर विजून पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. कागे हे शेळ्या चारण्यासाठी येणेगूर शिवारात गेले होते. शरणाप्पा पाटील, जितिन बनसोडे यांच्या शेतातील सामुदायिक बांधावर ते शेळ्या चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी विलास कागे डोक्यावर मेनकापड पांघरुन ते बांधाजवळ शेळ्याजवळ थांबले. त्याच्यासोबत असलेले दोघेजण जवळच असलेल्या गोठ्यात गेले. साडे पाच वाजण्याच्या सुमारास विलास कागे यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबात भोसगा गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भरत नाईकवाडे यांनी खबर दिल्यावरुन मुरुम पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुष्काळात होरपळणा-या शेतकरी, शेतमजूर यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतक-यांनी खरीप हंगाम साधण्यासाठी शेतीची मशागत अंतीम टप्प्यात पूर्ण केली. त्यामुळे पेरणीसाठी खते, बीबियाणे खरेदीसाठी गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत गर्दी केली आहे.