किसनराव राठोड
    बंजारा समाजाच्‍या सर्वांगिण विकासासाठी समाजाला एका छत्राखाली आणून राष्‍ट्रीय स्‍तरावर संघटित करण्‍याचा राष्‍ट्रीय बंजारा परिषदेच्‍या माध्‍यमातून किसनराव राठोड हे डिग्‍गेवाडी (ता. अक्‍कलकोट) येथे दि. 7 जून रोजी करीत असलेल्‍या बंजारा स्‍नेहमेळावा व बंजारा साहित्‍य परिषदेच्‍या निमित्‍ताने विशेष वृत्‍त...
    देशभर बंजारा समाज हा गोरमाटी, बंजारा, लमाणी अशा विविध नावाने ओळखले जाते. या समाजास स्‍वतःची चाली, रिती, रूढी, परंपरा, पध्‍दती, केशभूषा, वेशभूषा, आभूषणे, संस्‍कार, न्‍याय पध्‍दत व आचरण पध्‍दत आहे. बंजारा समाजास लोक गोर संस्‍कृतीद्वारे एकरुप झालेली आहेत. त्‍यानी ही संस्‍कृती आपल्‍या कथा, लोकगीत व भजनच्‍या माध्‍यमातून जपवणूक केलेली आहे. भारतातील सर्व भागात विखुरलेला बंजारा समाज संस्‍कृती, परंपरा, वेशभूषा, बोलीभाषा, तांडा पध्‍दती त्‍यातूनच स्‍वतःची ओळख निर्माण केलेली आहे. बंजारा समाजाचा इतिहास प्राचीन काळापासून असून त्‍याचा सखोल अभ्‍यास असणारी मंडळी, बंजारा साहित्‍य, संस्‍कृतीवर काम करणारे अनेक विद्वान, साहित्यिक समाजाला मिळाले आहे. अनेक वैचारिक लेख, पुस्‍तके निर्माण झाली आहेत. सांस्‍कृतिकदृष्‍टया एक असलेला समाज देशातील विविध प्रांतात कमी अधिक प्रमाणात असल्‍यामुळे राष्‍ट्रीय स्‍तरावर संघटित झाला नाही. त्‍यामुळे प्रांतिक प्रभावाखाली समाज दबला गेल्‍याचे चित्र आज पहावयास मिळत आहे.
    इतिहासामुळेच संस्‍कृती, परंपरा, वेशभूषा, बोलीभाषा टिकते. वेळोवेळीच्‍या राजकीय परिस्थितीमुळे बंजारा समाजाची म्‍हणावी तितकी प्रगती न झालयाने तो विस्‍कळीत झाला आहे. गरीब, बेरोजगारीमुळे समाज दिशाहीन झाला, अशिक्षित झाला. आज सर्व क्षेत्रात बंजारा समाजाने आपले अस्तित्‍व दाखवले आहे. पण सुशिक्षित पिढी बंजारा संस्‍कृती विसरत चालल्‍याचे चित्र दिसून येत आहे. सध्‍या बंजारा समाजातील सुशिक्षित वर्ग बंजारा बोलीभाषा विसरत चालले असून  त्‍यामुळे नवी पिढीला बंजारा भाषा बोलता येत नाही. अशा परिस्थितीत अनेक घटक समाजजागृती, प्रबोधन करीत आहेत. एकंदरीत, बंजारा समाजाच्‍या विकासासाठी देश पातळीवर समाज संघटित असावा, विविध ठिकाणी कार्यरत संघटनामध्‍ये समन्‍वयक असावे, समाजाकडे आदर्श अशी बंजारा संस्‍कृती परंपराबाबत मार्गदर्शन ग्रंथ असावे, जाती, पोटजाती, सण, उत्‍सव कळावेत, समाजाचा भविष्‍यकाळ उज्‍वल व पोषक वातावरण तयार करण्‍याकरीता या हेतूने राष्‍ट्रीय बंजारा परिषदेने देशभरातील वेगवेगळ्या प्रांतामध्‍ये असलेल्‍या तांड्यात जावून तेथील जेष्‍ठ मंडळी व जाणकाराकडून बंजारा समाजाचा इतिहास, संस्‍कृती विषयक अधिक माहिती जाणून घेतली.
   
राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे ठळक कार्य
* श्री हमुलाल महाराज तिर्थक्षेत्र अथणी मंदिर जिणोध्‍दार व भव्‍य विस्‍तार, भक्‍त निवास, वनराई, देशभरातील बंजारा संपर्क समन्‍वयासाठी नेटवर्क उभारणी
* 'साहित्‍य अकादमी' बंजारा भाषा संस्‍कृतीचा समावेश
* 14 राज्‍यातील प्रमुख संघटना, बंजारा नेते, कार्यकर्ते, साहित्यिक, जाणकार यांची संयुक्‍त बैठक चर्चासत्र, पुणे (कात्रज टेकडी) 25 एकर जागा श्री संत सेवालाल महाराजांचे तिर्थक्षेत्र निर्मितीसाठी जागा घेवून पूजन करण्‍यात आले.
* देशव्‍यापी 'महासम्‍मेलन' पुणे येथे. 15 राज्‍य, सातशे सन्‍मानित बंजारा नेते, संघटना सहभाग
* साहित्यिक परिषदेस 45 लेखक, विचारवंत, साहित्यिक सहभागी
* बेंगलोर येथे भव्‍य कार्यक्रम, चर्चासत्र
* दिल्‍ली - बंजारा 48 तांड्याना भेटी, सन्‍मानसोहळा, चर्चा, संघटन
* राजस्‍थान, उत्‍तरप्रदेश, आग्रा, लखनौ कार्यक्रमात सहभागी
* गुजरात - बंजारा सांस्‍कृतिक कार्यक्रम 'ओळख बंजारा संस्‍कृती' भेटी उत्‍स्‍फुर्त सहभाग
* मध्‍यप्रदेश - 'धरणा कार्यक्रमात' सहभागी, इंदौर बंजारा धर्मगुरु रतनसिंग यांचे सन्‍मानात कार्यक्रम अनेक ठिकाणी भेटी, दौरे, बंजारा धार्मिक, आश्रम भेट, समाज संघटना चर्चा
* मुंबई - पेण (गागोदे) शक्‍तीस्‍थळ भूमिपूजन, पाच हजार बंजारा सहभाग
* कर्नाटक, अथणी, बेंगलोर, तुमकुर, दावनगेरी, म्‍हैसुर, धारवाड, विजापूर, लिंगसूर, गुलबर्गा, रायचूर, बेल्‍लारी, हुक्‍केरी, कावेरी, बेळगाव, बागलकोट, हास्‍पेट अनेक कार्यक्रमांचे आयोजन, लाखोंचा जनसमुदाय उपस्थित
* आंधप्रदेश - तांडा प्रमुख, नायक, अधिकारी संमेलन, बंजारा साहित्‍यीक संमेलन, बंजारा केंद्राना भेटी
* जम्‍मू, पंजाब, हरियाणा, छत्‍तीसगढ, केरळ कार्यक्रमात सहभागी, चर्चा भेटी, बंजारा स्‍थळांना भेटी, जनजागती
* अक्‍कलकोट 'शांतीस्‍थळ' समाजास अर्पण, भव्‍य सांस्‍कृतिक मंदीर मनपरिवर्तन केंद्र 10 एकर जागेत ड्रिम प्रोजेक्‍ट उभारणी सुरुवात, वस्‍त्रदान, अन्‍नदान, शैक्षणिक मदत कार्य. पंधरा हजार लोकांची उपस्थिती. धर्मगुरु जगतगुरु यांची उपस्थिती, भव्‍य कार्यक्रम
* विजापूर सोमदेवरहट्टी दुर्गादेवी महोत्‍सवाचे आयोजन, हजारो लोकांची उपस्थिती.
* श्री तुळसीसाध महाराज (टक्‍कळगी) मंदीर उभारणी, भव्‍य समाज अर्पण सोहळा
* विजापूर बंजारा क्रॉस श्री हमुलाल महाराज मंदीर उभारणीसाठी जनजागृती, हजारो बंजारा सहभागी, दोन वर्षात लहान मोठ्या हजारो कार्यक्रमात सहभाग
* श्री संत सेवालाल महाराज जयंती, पुण्‍यतिथी कार्यक्रमास सहभाग व सहकार्य, समाजजागृती
* दक्षिण भारत, पूर्व भारत अभ्‍यास दौरा, संस्‍कृती, शिक्षण, समस्‍या यावर उपाययोजना करीत शासन स्‍तरावर बैठक, आरक्षणा संदर्भात सक्रिय सहभाग, जनजागृती रॅली, भव्‍य मोर्चा.
* महाराष्‍ट्र शासनासोबत बंजारा समाजाच्‍या समस्‍याबाबत मंत्री महोदय, सचिव व बंजारा नेते यांची मंत्रालय, मुंबई येथे यशस्‍वी बैठक
* देशभरात बंजारा तांडा संस्‍कृती अभ्‍यासासाठी मोहिम
* अथणी श्री हमुलाल महाराज मंदिरासमोरील 5 एकर जागा 1 कोटी 60 लाखात खरेदी करुन समाजाला अर्पण, भक्‍तांच्‍या सोयीसाठी भक्‍तनिवास, सांस्‍कृतिक भवनचे भूमिपूजन
* देशभरातून 823 बंजारा मुला-मुलींना दत्‍तक घेवून शैक्षणिक खर्च, 350 हून अधिक बिगरहुंडा लग्‍नास आर्थिक सहाय्य, बंजारा साहित्‍य निर्मितीस देशभरात अर्थसहाय्य, शस्‍त्रक्रिया सहाय्य, मंदिर निर्मितीस सहाय्य इत्‍यादी. यासह अनेक उपक्रम बंजारा समाजाच्‍या विकासासाठी राष्‍ट्रीय बंजारा परिषद विशेष उपक्रम राबवित आहे.
 
Top