पुणे : दहावीच्या (माध्यमिक शालांत प्रमाणपत्र) परीक्षेचा निकाल ७ जून रोजी जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांना १५ जून रोजी गुणपत्रकांचे वाटप करण्यात येणार असून २५ जूनपर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रकासाठी अर्ज करता येणार आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे १४ लाख विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापुर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागांमार्फत घेण्यात आली होती. शुक्रवारी मंडळाच्या वेबसाईटसह काही वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहाता येईल. दरम्यान, एसएमएसद्वारे बीएसएनएलने निकाल पाहाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ
http://maharesult.nic.in
www.msbshse.ac.in
www.mh-ssc.ac.in
www.ssscresult.mkcl.org
www.rediff.com/exams