नळदुर्ग -: शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही इंग्रजी माध्‍यमांच्‍या शाळा मोठ्या प्रमाणात सुरु होत असल्‍याने याचा फार मोठा फटका शाळांना बसत असून यामुळे मराठी शाळांचे भवितव्‍य चिंताजनक बनत चालले आहे. पालकांचा तसेच विद्यार्थ्‍यांचाही कल इंग्रजी शाळांकडेच वाढत चालला आहे. याचाच फायदा घेत इंग्रजी शाळा सुरु करणारे संस्‍थाचालक अव्‍वाच्‍या सव्‍वा फीस आकारुन पालकांची लुट करताना करताना दिसून येत आहेत.
    पूर्वी मोठ्या शहरात, जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी त्‍याही अगदी बोटावर मोजण्‍या इतक्‍याच इंग्रजी माध्‍यमांच्‍या शाळा होत्‍या. मात्र गेल्‍या दोन-चार वर्षात शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही इंग्रजी शाळा मोठ्याप्रमाणात सुरु झाल्‍याचे दिसून येत आहे. इंग्रजी शाळा सुरु करुन आज अनेकजण शिक्षणसम्राट बनत चालले आहेत. त्‍याचबरोबर सध्‍या ज्‍या खेडेगावात इंग्रजी शाळा सुरु झाल्‍या आहेत. त्‍यातील किती शाळज्ञंना शासनाची मान्‍यता आहे हे मसजत नाही. त्‍याचबरोबर इंग्रजी शाळा सुरु करण्‍यामध्‍ये दोन शाळांमधील अंतर किती असावे, तसेच जि.प. च्‍या मराठी शाळेजवळ इंग्रजी शाळा सुरु करता येते का, हेही कुणी पाहत नसल्‍याने गावागावात इंग्रजी शाळा सुरु होत आहे.
    सध्‍या जि.प.च्‍या मराठी प्राथमिक शाळांमधूनही सेमी इंग्रजी शिकविले जात आहे. मात्र पालक तसेच विद्यार्थ्‍यांचा कल हा जि.प. शाळांऐवजी इंग्रजी शाळांकडेच जास्‍त असल्‍याने व जास्‍त गावोगाव इंग्रजी शाळा सुरु होत असल्‍याने मराठी शाळेचे भवितव्‍य चिंताजनक बनत चालले आहे. याचाच परिणाम म्‍हणून जि.प. च्‍या शाळांमधील संख्‍या रोडावत चालली आहे. पूर्वी गावात सरकारी शाळा व्‍यतिरिक्‍त इतर कोणत्‍याही शाळा नसायच्‍या, त्‍यामुळे शिक्षण संस्था उघडल्‍या असल्‍याने व या शाळंमध्‍ये मुबलक खेळाचे साहित्‍य व विद्यार्थ्‍यांच्‍या कलागुणाना वाव यामुळे विद्यार्थी शाळेत रमताना दिसून येत आहेत. आज मराठी शाळांमधून पोषण आहार देण्‍याबरोबरच शाळेची इमारतही भव्‍य असूनदेखील अशा शाळांकडे विद्यार्थी येत नाहीत, तर पालकांचा कल महागडे असले तरी इंग्रजी शिक्षण देण्‍याकडेच असल्‍याने याचा परिणाम मराठी शाळांवर होत असल्‍याचे दिसून येत आहे.
 
Top