नळदुर्ग -: घराच्या दुस-या मजल्यावर काम करीत असताना याच घराच्या अवघ्या एक फुटाच्या अंतरावरुन गेलेल्या विद्युत तारेस बांधकाम कारागीर युवकाचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी इटकळ (ता. तुळजापूर) येथे घडली.
इटकळ (ता. तुळजापूर) येथे युसुफ पठाण यांच्या घराचे दुस-या मजल्यावर छताचे काम सुरु आहे. मंगळवारी सकाळी अकरा वाजता अनिल शहाजी जाधव (वय 42, रा. शिरगापूर, ता. तुळजापूर) हा तरुण स्लॅबसाठी जाळी बांधण्याचे काम करीत होता. दरम्यान घराच्या अवघ्या फुटभर अंतरावरुन 33 के.व्ही. दाबाचा विद्युत प्रवाह असलेल्या तारेचा धक्का बसल्याने तारेवच अनिल जाधव खेचला गेला. या दुर्घटनेत अनिल जाधव याचा जागीच मृत्यू झाला. घराच्या दोन्ही बाजूने विद्युत तारा असताना महावितरण कंपनीस कुठलीही माहिती दिली नसल्याचे महावितरण शाखा अणदूर येथील अभियंता प्रशांत पाटील यांनी सांगितले.
याबाबत घरमालक युसूफ पठाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मात मृत्यूची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय शिंदे हे करीत आहेत.