उस्मानाबाद :- सन 2013-14 या शैक्षणिक वर्षासाठी स्थानिक किराणा दुकानातुन धान्य व मसाल्याच्या पदार्थाच्या खरेदीकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय,उस्मानाबाद यांचे मार्फत  25 जून 2013 पर्यंत दरपत्रक मागविण्यात आले आहे. माजी /युध्द विधवा/माजी सैनिकाच्या मुलांकरिता हे वसतिगृह चालविण्यात येते. तरी इच्छुक किराणा दुकानदारांनी दरपत्रक वसतिगृह अधिक्षक, सैनिकी मुलांचे वसतिगृह, खाजानगर, उस्मानाबाद यांचेकडे पाठवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासने यांनी केले आहे
 
Top