नळदुर्ग -: अक्‍कलकोट येथे दि. 7 जून रोजी होणा-या पहिले राष्‍ट्रीय बंजारा साहित्‍य संमेलनाकरीता उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातून हजारोच्‍या संख्‍येनी बंजारा बांधवांनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे उस्‍मानाबाद जिल्‍हा संघटक राम पवार यांनी केले.
    नळदुर्ग येथील शासकीय विश्रामगृहावर बंजारा समाज बांधवाची बैठक सरपंच वसंत पवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली घेण्‍यात आली. यावेळी राम पवार बोलताना पुढे म्‍हणाले की, राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्‍यक्ष किसनराव राठोड यांनी समाज बांधवाना एकत्रित आणून समाज प्रबोधनासाठी निस्‍वार्थ वृत्‍तीने कार्य करीत असल्‍याचे सांगून आयोजित बंजारा साहित्‍य संमेलन कुठल्‍याही राजकीय पक्षाचे व्‍यासपीठ नसून केवळ समाज बांधवाचे हित जोपासण्‍यासाठी हे संमेलन आयोजित करण्‍यात आले आहे. तेंव्‍हा समाजबांधवानी राजकीय हेवेदावे, गट तट बाजूला ठेवून समाजाच्‍या हिताकरीता जिल्‍ह्यातून जास्‍तीत जास्‍त संख्‍येनी बंजारा साहित्‍य संमेलनामध्‍ये भाग घ्‍यावे, असे आवाहन करण्‍यात आले आहे.
    या बैठकीमध्‍ये आयोजित बंजारा साहित्‍य संमेलनाबाबत सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली. यावेळी अनेकानी आपले विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाच्‍या प्रारंभी उपस्थित मान्‍यवरांचे पुष्‍पगुच्‍छ देवून स्‍वागत करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक व सूत्रसंचालन राष्‍ट्रीय मागासवर्गीय खुले कृषी विद्यालयाचे अध्‍यक्ष प्रवीण पवार यांनी केले. या कार्यक्रमास भिमराव पवार, शाम पवार, सिताराम राठोड, माणिक जाधव, धनराम चव्‍हाण, मोहन चव्‍हाण, भिकाजी राठोड, शिवराम राठोड, हरी पवार, राजू राठोड यांच्‍यासह तुळजापूर, उमरगा, लोहारा यासह उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील बंजारा कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top