बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील अण्णा हजारे प्रणित भ्रष्‍टाचार विरोधी जन आंदोलन न्‍यास आणि बार्शी तालुका विकास मंचच्‍यावतीने बार्शी नगरपरिषदेने पुतळा पार्क येथील केलेल्‍या बेकायदा वृक्षतोडीचा निषेध करत श्रध्‍दांजली अर्पण करुन आंदोलन करण्‍यात आले. यावेळी अण्‍णा हजारे समितीचे शहराध्‍यक्ष एल.बी. शेख, सचिव सचिन गायकवाड, विक्रम सावळे, पोपट वीर, सुरेश साबळे, योगेश दिक्षीत, प्रशांत कानडे, सागर आवटे, हेमंत रामगुडे, वृक्षमित्र शिरीष ताटे, मयुर डोईफोडे, अज्‍जु बागवाद आदी आंदोलनकर्ते उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना विक्रम सावळे म्‍हणाले की, शासनाच्‍यावतीने शतकोटी वृक्ष सारखे उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. पंरतु बार्शी नगरपरिषद मात्र कोणत्‍याही कायद्याची पूर्तता न करता वृक्षांची तोड करत आहे. अण्‍णा हजारे यांच्‍या पंचसूत्रीमध्‍ये असलेल्‍या कु-हाड बंदी उपक्रमानुसार बार्शी शाखेनही वृक्षांची जपणूक केली आहे. शासनापर्यंत आवाज उठविण्‍यासाठी समितीमार्फत श्रध्‍दांजलीचा कार्यक्रम घेण्‍यात येत असून वृक्षतोडीचा निषेध करीत आहोत.
    गणेश चव्‍हाण, प्रशांत कानडे, सचिन गायकवाड, एल.बी. शेख यांनी समयोचित विचार मांडले. सदरच्‍या निवेदनाची प्रत बार्शी तहसिलदार यांच्‍याकडे देण्‍यात आली.
 
Top