उस्मानाबाद :- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे अंतर्गत अध्यापक शिक्षण पदविका ( डी.टी.एड.) साठी प्रवेश अर्ज विक्री व स्वीकृती केंद्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, डी, आय. सी. रोड. बार्शी नाका उस्मानाबाद येथे सुरु आहे. उस्मानाबाद जिल्हयात शासकीय कोटयातील एक हजार 72 जागा  मराठी माध्यमाच्या तर उर्दु माध्यमाच्या 50 जागा आहेत. खुल्या संवर्गासाठी गुणांची किमान मर्यादा 50 टक्के व मागास संवर्गासाठी गुणांची किमान मर्यादा 45टक्के आहे. खुल्या संवगातील उमेदवारांसाठी 200  रुपये तर मागास वर्गीय उमेदवारांसाठी 100 रुपये  आवेदन पत्र शुल्क आहे. आवेदन पत्र विक्री व स्वीकृतीस मिळालेला प्रतिसाद व इयत्ता 12 वीचा जाहीर झालेला निकाल विचारात घेता आवेदनपत्र विक्रीस व स्विकृतीस दि. 15 जुन 2013 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. मुदत वाढल्यामुळे पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या सत्यप्रती जोडून आवेदन पत्रे सादर करावेत असे आवाहन प्राचार्या डॉ. कमलादेवी एस. आवटे यांनी केले आहे.    
 
Top