बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: अतिरिक्‍त साखर शिधापत्रिकाधारकांना देण्‍यासाठी जिल्‍हा पुरवठा विभागाने दिली. परंतु त्‍याचा अपहार झाल्‍याने चौकशी करण्‍याची मागणी सामाजिक कार्यकर्ते एल.बी. शेख यांनी केली आहे.
    निवेदनात नमूद केले आहे की, जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांच्‍या कार्यालयाकडून एप्रिल व जून 2012 करीता मंजूर केलेली 8337 क्विंटल साखर ममे 2013 मे वितरित करण्‍यासाठी दिली. परंतु सदरची साखर वितरित न करता अधिकारी व दुकानदार यांनी संगनमताने कागदोपत्रीच वितरित केली असून त्‍याची सखोल चौकशी करण्‍यात यावी.सदरचे बोगस रेकॉर्ड केल्‍याने शासनासह शिधापत्रिकाधारकांचीही फसवणूक केली जात आहे. सदरच्या प्रकरणाची गंभीर दखल घेवून वरिष्‍ठ पथकांमार्फत तपासणी करावी तसेच दोषीवर जीवनावश्‍यक कायद्याप्रमाणे फौजदारी स्‍वरुपाचे गुन्‍हे दाखल करण्‍याची मागणी अण्‍णा हजारे समितीचे शहराध्‍यक्ष एल.बी. शेख यांनी जिल्‍हाधिका-यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 
Top