उस्मानाबाद :- अनुसूचित  जाती, जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय जाती, शारिरीक आणि मानसिकदृटया अपंग, कुष्ठरोगी तसेच भूमिहिन व दलित क्षेत्रात उल्लेखनिय व नि:स्वार्थपणे कार्य करणा-या सामाजिक कार्यकर्त्याचा व स्वयंसेवा संस्थांना पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार देण्यात येतो. सन 2012-13 च्या पुरस्कारासाठी दिनांक 15 जुलैपर्यंत अर्ज करावेत. अधिक माहितीसाठी 02472-222014 येथे संपर्क करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण उस्मानाबाद यांनी केले आहे.
 
Top