![]() |
सुरज गव्हाणे |
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील सुरज रमेश गव्हाणे यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या बार्शी तालुका युवक अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मराठा महासंघाचे जिल्हा सचिव संदीप मोरे यांनी निवडीचे पत्र दिले. मराठा महासंघाच्या माध्यमातून समाज प्रबोधनात्मक कार्य करण्याबरोबरच मराठा महासंघाची ध्येयधोरणे, विचार युवकांपर्यंत पोहचविण्याचे व संघटनात्मक बांधी करणार असल्याचे यावेळी नूतन युवक तालुकाध्यक्ष सुरज गव्हाणे यांनी सांगिले. यावेळी माढा तालुकाध्यक्ष धनाजी गोडसे, उमेश काळे, कसबा ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत शिंदे, क्रीडाधिकारी आप्पासाहेब बरबडे, सच्चिदानंद पवार, पांडुरंग राऊत, संभाजी राऊत, चिंतामणी ग्रुपचे अध्यक्ष दिपक चव्हाण, सोनू ठोंबरे, भैय्या ठोंबरे, सलिम शेख, अमित बाशिंगे आदीजण उपस्थित होते.