बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: प्रथम वर्ष पदविका (डिप्‍लोमा) परीक्षेतील भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी या डिग्री व डिप्‍लोमा महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी उत्‍तुंग यश संपादित केले आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्‍या कु. प्रणिता प्रदिप देशपांडे हिने 85.65 टक्‍के गुण मिळवून सुयश मिळविले. प्रमोद संजय माने यास 82 टक्‍के गुण मिळाले असून इलेक्‍टॉनिक अँण्‍ड टेलिकम्‍युनिकेशच्‍या शगुप्‍ता पठाण हिस 76.37 टक्‍के, स्‍वामीनी दुधे हिस 76.29 टक्‍के गुण मिळाले आहे. तर मेकॅनिकल इंजिनअरिंग विभागाचा निकाल 86 टक्‍के तर इलेक्‍टॉनिक अँण्‍ड टेलिकम्‍युनिकेशन विभागाचा निकाल 70 टक्‍कके लागला आहे.
    संस्‍थाध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी सर्व यशस्‍वी विद्यार्थ्‍यांचे कौतुक करत विशेष यश संपादित केलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा सत्‍कार केला. महाराष्‍ट्र तंत्रशिक्षण मंडळाच्‍या अँकॅडेमिक मॉनिटरिंग कमिटीने महाविद्यालयास गुड हा दर्जा बहाल केला आहे. पदविका अभियांत्रिकीच्‍या पहिल्‍याच वर्षी म‍हाविद्यालयातील विद्यार्थ्‍यांनी चांगल्‍या गुणांकनामध्‍ये सुयश मिळविल्‍याबद्दल संस्‍थाध्‍यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी प्राचार्य डॉ. जे.सी. बुरसे, उपप्राचार्य मृगेंद्र अंधारे, मेकॅनिकल विभागप्रमुख प्रा. व्‍ही.एल. मुंढे, बेसिक सायन्‍स विभागप्रमुख प्रा.जी.एन. सोपल, ई.टी.सी. विभागप्रमुख प्रा. एस.एच. माळी, ई.टी.सी. (डिप्‍लोमा) विभागप्रख प्रा. थोरबोले, जे.ए. सिव्‍हील विभागप्रमुख प्रा. आर.एन. शिराळे यांचे अभिनंदन केले.
 
Top