सोलापूर :-  कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार 2013-14 करीता सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांच्या कार्यालयात दिनांक 15 जुलै पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
     अनुसूचित जाती, जमाती/ भटक्या विमुक्त जाती, अपंग, मनोदुर्बल, कुष्ठरोग, भूमीहीन दलित वर्गासाठी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टया कल्याणकारी कार्य करणा-या समाजसेवक व सामाजिक संस्था यांच्यासाठी राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. वैयक्तिक, संस्था अशा पातळीवर हा पुरस्कार आहे. त्यासाठी व्यक्तीचे वय 50 वा त्यापेक्षा जास्त असावे, महिलांकरीता 40 वर्षे वा त्यापेक्षा जास्त असावे आणि किमान 10 वर्षे कार्य केलेले असावे, त्यांच्या कार्यावरुन पुरस्कारासाठी निवड केली जाणार आहे. तरी इच्छुकांनी विहित नमुन्यात अर्ज भरुन दिनांक 15 जुलै 2013 पर्यंत प्रस्ताव सादर करावे, अर्जाचे नमुने  असे आवाहन सहाय्यक आयुक्त, दिपक घाटे यांनी कळविले आहे.

शाहू - फुले - आंबेडकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवा

सोलापूर :- 
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून दरवर्षी शाहु - फुले - आंबेडकर पुरस्कारासाठी दिनांक 10 जून 2013 पर्यंत सहायक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर यांच्या कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव सादर करावे. असे सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सोलापूर दीपक घाटे यांनी कळविले आहे.
    समाज कल्याण विभागाच्या मागसवर्गीय मुली - मुलींचे शासकीय वसतीगृह, खाजगी संस्थेकडून चालविण्यात येणारे अनुदानित मुलांमुलींचे वसतीगृहे, अनुदानित अपंग संस्था, अनुदानित अनूसुचित जाती निवासी शाळा, अनुदानित भटक्या विमुक्त जाती आश्रमशाळा इ. संस्था या पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करु शकतील.
    सदर पुरस्कारासाठी शासनाने राज्यातील 6 विभागात प्रत्येकी 1 प्रमाणे 6 संस्थांना रुपये 15 लाख प्रमाणे पुरस्काराची रक्क्म देण्यात येईल
.
 
Top