तुळजापूर -: बारुळ (ता. तुळजापूर) येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी तपासाची चक्रे वेगाने फिरवून पोलिसांनी मृत महिलेचा जावई तसेच शेताच्या भागनाला(शेत कसणारा) अटक केली आहे.
    बारुळ येथे कमलाबाई शहाजी शिंदे (55) व त्यांचा नातू संदीप महादेव जाधव (18) यांचे मृतदेह शेतातील पळसाच्या अळ्यात सोमवारी सकाळी 7 वाजेच्या सुमारास संशयास्पद स्थितीत आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून मृत कमलाबाई यांचा जावई संतोष दशरथ मारवडकर (रा. मुळेवाडी, ता. उस्मानाबाद) व भागीन तानाजी ऊर्फ बापू मच्छिंद्र मस्के यांना अटक केली आहे. याप्रकरणी दोघांना न्यायालयासमोर हजर केले असता, शनिवारपर्यंत (दि. 8) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी शर्मिष्ठा घारगे करीत आहेत. कमलाबाई यांना असलेल्या 14 एकर जमिनीतून दोन मुलींना प्रत्येकी पाच एकर जमीन त्यांनी वाटून दिली होती. हलक्या प्रतीची जमीन दिल्याच्या कारणावरून जावयाने त्यांचा खून केला.
 
Top