उस्मानाबाद :- केंद्र पुरस्कृत वैरण विकास योजना सन -2013 -14 अंतर्गत विजेवर चालणा-या कडबाकुट्टी यंत्र आणि मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्याकरिता अर्थसहाय, या वर्षासाठी उस्मानाबाद जिल्यातून या योजनेसाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
विजेवर चालणा-या कडबाकुट्टी यंत्राच्या वापरासाठी प्रोत्साहन 75 टक्के अनुदानावर खालील निकष पुर्ण करणा-या पशुपालकांना विजेवर चालणा-या कडबाकुट्टी यंत्रासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. विजेवर चालणा-या मोटरीच्या अश्वश्क्तीनुसार सोडत पध्दतीने निवडलेलया लाभार्थ्यांनी जमा केलेल्या रक्कमे प्रमाणे प्रति लाभार्थी रु.13050/ व रु.15000/- प्रमाणे 75 टक्के अनुदानाची रक्कम कडबाकुटी यंत्र खरेदीसाठी देण्यात येणार आहे. तरी लाभार्थींनी त्यांच्या पसंतीनुसार 2 एच. पी च्या कडबाकुट्टी यंत्रासाठी रु4350/- व 3 एच. पी. च्या कडबाकुटी यंत्रसाठी रु. 14990/-आणि 5 एच. पी. च्या कडबाकुटृ्टी यंत्रासाठी रु. 27650/- या प्रमाणे रक्कम भरावयाची आहे. याप्रमाणे 25 टक्के लोकवाटयासह येणा-या जास्तीचा खर्च लाभार्थ्यांनी स्वत: करावयाचा आहे.
लाभार्थी शेतक-याकडे कमीत कमी संकरीत व सुधारीत जातीची 10 जनावरे असणे आवश्यक आहे. आनुसुचित जाती/ जमातीमधील शेतक-यांकडे किमान संकरीत व सुधारीत 5 जनावरे असणे आवश्यक आहे. लाभार्थी शेतक-यांने या पुर्वी या योजनेचा अथवा या सारख्या कोणत्याही शासकीय अथवा निमशासकीय संस्थेकडून लाभ घेतलेला नसावा.
स्थानिक पुशुवैधकीय अधिकारी यांची शिफारस आवश्यक आहे. विजेवर चालणा-या कडबाकुटी यंत्र चालविण्यासाठी शेतक-यांकडे विज जोडणी असणे अत्यावश्यक आहे. मुरघास तयार करण्याचे युनिट स्थापन करण्या करिता अर्थसहाय 1.05 लक्ष्य रक्कमेच्या मर्यादीत 100 टक्के अनुदानावर खालील निकष पुर्ण करणा-या पशुपालकांना मुरघास तयार करण्याचे बांधकाम करणे व विजेवर चालणा-या कडबाकुटी यंत्र खरेदीसाठी प्रस्ताव खात्यामार्फत केंद्रशासनास सादर करावयाचे आहेत. यासाठी अर्जाच्या स्वरुपातील प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. मुरघास तयार करण्यासाठीचे बांधकाम करण्यासाठी रु. 75000/- आणि विज चलीत कडबाकुट्टी यंत्र खरेदीसाठी रु.30000/- एवढे अनुदान देय आहे. लाभार्थ्यांची त्यांच्या ईच्छेप्रमाणे 5 एच.पी.च्याकडबाकुटी यंत्रासाठीची मागणी असल्यास रु12650/- एवढी जास्तीची रक्कम भरावयाची आहे. या प्रमाणे येणारा जास्तीचा खर्च लाभार्थ्यांनी स्वत: करावयाचा आहे. लाभार्थीकडे किमान 5 गुंठे सिंचनाची सुविधा उपलब्ध असलेली बागायती जमीन असावी विजेवर चालणारी कडबाकुटी यंत्र चालविण्यासाठी शेतक- यांकडे विध्युत जोडणी अत्यावश्यक आहे.लाभार्थींनी मुरघास तयार करण्यासाठी 4 फुट रुंद व 10 फुट लांब आणि 10 फुट उंची अशा प्रकारे 2 आयाताकृती गाळयाचे बांधकाम करावयाचे आहे. अथवा वर्तुळाकार बांधकामासाठी 11 फुट 2 इंच व्यास, 10 फुट उंचीचे असे 9 इंचाचे वाळू सिमेंटमध्ये पक्के वीटबांधकम करवायचे आहे.
उपरोक्त याजनेसाठी दि.6 जुन 2013 पर्यंत प्रस्तावाच्या स्वरुपात पशुपालकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाचा नमुना संबधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्या कार्यालयात व जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी उस्मानाबाद यांच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. योजना केंद्र पुरस्कृत असून अनुदान मंजुरी नंतरच लोकवाटा भरावयाचा आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी सर्व पशुवैधकीय दवाखाने व संबधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती यांच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयक्त यांनी कळविले आहे.