उस्मानाबाद :- जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित सर्वसाधारण घटक योजनेतील सुशिक्षीत बेरोजगार युवक- युवतीसाठी मोफत घरगुती उपकरणे दुरुस्ती व मोटार रिवायडिंग प्रशिक्षण कार्यक्रम उस्मानाबाद येथे आयोजित केला आहे.
सदरील प्रशिक्षण कार्यक्रमाध्ये संपुर्ण घरगुती उपकरणे दुरुस्ती व मोटार रिवायडिंग व उद्योजकीय अभ्यासक्रम या विषयी दररोज 12 ते 5 या कालावधीमध्ये तज्ञ मार्गर्शक व अधिकारी यांच्या द्वारे माहिती दिली जाणार आहे. तरी इच्छुक युवक -युवती व महिलांनी प्रवेश अर्ज भरणेसाठी व अधिक माहितीसाठी दि. 6 जुन 2013 पर्यंत संपर्क साधवा तसेच दि. 7 जुन 2013 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. अधिक माहिती व अर्जासाठी कार्यक्रम समन्वयक अर्चना माळी. मो. 9822671421 यांच्याशी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र द्वारा जिल्हा उद्योग केंद्र उस्मानाबाद येथे संपर्क साधावा.