उस्मानाबाद :- राज्य परिवहन मंडळाने सहाय्यक कनिष्ठ पदासाठी एम. के. सी एल. पुणे संस्थेमार्फत लेखी परिक्षा घेण्यात आली होती . सदर लेखी परीक्षेचा निकाल एम के सी एल पुणे या संस्थेच्या http//msrtc.mkcl.org व महामंडळाच्या WWW. msrtc.gov.in या वेबसाईटवर (संकेत स्तळावर ) प्रसिध्द करण्यात आलेला आहे.
सदर लेखी परीक्षेत उर्तीण झालेल्या सहाय्यक कनिष्ठ उमेदवारांना शैक्षणिक कागदपत्र तपासणीसाठी विभागीय तपासणी समिती समोर दि. 13जून 2013 रोजी सकाळी ठिक 8 वाजता राज्य परिवहन मंडळ विभागीय कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ उस्मानाबाद येथे उपस्थित राहावे. उमेदवारांनी तपासणीसाठी येताना जाहिरातीमध्ये दिलेली शैक्षणीक पात्रता शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला , इ 10 वी पास असल्याचे प्रमाण पत्र/ गुणपत्रक,शासन मान्य आ.टी आय मधील मोटार मॅकानिकल/ शिटमेटल/ इलेक्टिशियन / ऑटी इलेक्टिशियन या पैकी एक कोर्स उर्त्तीण असल्याचे प्रमाणपत्र, माजी सैनिक/ प्रकल्पग्रस्त/ भूकंपग्रस्त अंशकालीन /राज्य स्तरीय खेळाडू असल्यास सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला दाखला , सेवायोजन / समाज कल्याण कार्यालयात व इतर मान्यता प्राप्त संस्थेमधील नोंदनी कार्ड क्रमांक इत्यादी सह स्व: खर्चाने हजर राहवे असे विभाग नियंत्रक राज्य मार्ग् परिवहन मंडळ यांनी कळविले आहे.