उस्मानाबाद :- राष्‍ट्रीय भुमी अभिलेख अधुनिकीकरण ई- चावडी जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यकमाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या हस्ते 4 जुन रोजी करण्यात आले. या प्रसंगी अप्पर जिल्हधिकारी ज्ञानोबा फुलारी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी सी.व्ही. सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, (उस्मानाबाद), उपविभागीय अधिकारी शोभा ठाकुर, (भुम)  उपविभागीय अधिकारी (भूसंपादन) एम. जी .मुल्ला,उपजिल्हाधिकारी ( भूसंपादन) के.ए. तडवी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) संतोष राऊत,उपजिल्हाधिकारी( भूसंपादन) शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी( भूसंपादन) सचिन बारवकर , तहसिलदार (भूम) अहिल्या गठाळ. यांची प्रमुख उपस्थिती होती.
    या प्रसंगी जिल्हाधिकारी नागरगोजे म्हणाले की भूमी अभिलेखाचे संगणकीकरण व महसूल विभागाचे  मजबुतीकरण तसेच भूमी अभिलखे दुरुस्ती आदी बाबत हे प्रशिक्षण देण्यात येत असून हे प्रशिक्षण तलाठी व संबधित अधिकारी यांनी आत्मसात करुन आपल्या कामात गती अणावी व जनतेमध्ये  शासनाची प्रतिमा उंचवावी असे आवाहन केले. यामध्ये ई चावडी कार्यप्रणाली  ही पुर्ण संगणीकृत असून या पुढे हस्तलिखीत काम करण्याची वेळ येणार नाही असे सांगितले. अप्पर जिल्हाधिकरी फुलारी म्हणाले की या कामात तलाठयानी पुढाकार घेवून कामे करावी व संगणकी करणामुळे काम सोपे झाले आहे. त्यामुळे तलाठयाच्या कामास गती मिळाली आहे. ब-याच वेळी काही कामे. ऑनलाईन करणे आवश्यक असते त्यावळी सर्व कामे काळजी पुर्वक करावे असे सांगितले.
     ई- चावडी आणि ई म्युटेशन आज्ञावली ,जिल्हास्तरीय प्रशिक्षण भूम विभागासाठी दि. 4 व 5 जुन रोजी व उस्मानाबाद विभागासाठी दि.6 व 7 जुन रोजी होत आहे. या प्रसंगी भुम विभागातील नायब तहसीदार, मंडळ अधिकारी तलाठी उपस्थित, असून . या प्रशिक्षण कार्याक्रमाचे आयोजन व्हीजन ॲक्याडमीने केले असून हे प्रशिक्षण पार पाडण्यासाठी महसूल संघटनेचे अध्यक्ष जीवन कुलकर्णी, तलासठी संघटनेचे अध्यक्ष  नितीन मंडाळे व सर्व महसूल विभागचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन आपती व्यवस्थापन अधिकारी वृशाली तेलोरे यांनी केले.
 
Top