नवी दिल्‍ली -: कोणीही उठतो, काहीही करतो आणि फेसबुकवर टाकतो... मग ती गोष्‍ट सार्वजनिक असो की खासगी आयुष्‍यातील. सोशल साईटसवरील सर्वांसाठी सर्वकाही ही वृत्‍ती भारतीयांमध्‍ये प्रचंड प्रमाणात वाढत असून त्‍यामुळे फेसबुक शेअरिंग आणि टिवटरवरील टिवटिवात भारतीयांनी अनेक देशाना मागे टाकल्‍याचे एका अभ्‍यासातून उघड झाले आहे.
    इंटरनेट आणि कंप्‍युटिंग टेण्‍ड या अमेरिकी कंपनीने याबाबत सर्वेक्षण केले आहे. त्‍यानुसार खासगी जीवनातील सर्वकाही ऑनलाईन शेअर करणा-या युझर्सच्‍या यादीत भारताने दुस-या क्रमांकावर झेप घेतली आहे. तर याच यादीत अरेबियाने पहिला क्रमांक पटकावला आहे.
    केलिनर परिकन्‍स कॉफिल्‍ड अँण्‍ड बावर्स (केपीसीबी) या फर्मने केलेल्‍या सर्वेक्षणामध्‍ये स्‍मार्ट फोनचा वाढता वापर, इंटरनेट युझर्सची वाढती संख्‍या, टॅबलेट कंम्‍प्‍युटिंगचा वापर आदींचा अभ्‍यास करुन मिकर रिपोर्ट नावाचा अहवाल सादर करण्‍यात आला आहे. यात ऑनलाईन शेअरिंगमध्‍ये स्‍टेटस अपडेटस, भावना शेअर करणे, फोटो, व्हिडीओ आणि लिंक्‍स शेअर करणे या गोष्‍टींचा समावेश आहे.
    मागील वर्षात स्‍मार्टफोन वापरणा-यांच्‍या संख्‍येचा विचार करता जगभरातील देशामध्‍ये भारताचा पाचवा क्रमांक लागत होता. त्‍या तुलनेत यंदा स्‍मार्टफोन वापरणा-यांची संख्‍या 52 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. 2008 ते 2012 या चार वर्षात भारतामध्‍ये 88 लाख स्‍मार्टफोनची विक्री झाली असून मागील वर्षात इंटरनेट वापरणा-यांची संख्‍याही 137 लाखांवर जावून पोहोचली आहे. स्‍मार्टफोन वापरात चीन खालोखाल भारताचा क्रमांक लागतो. चीनमधील स्‍मार्टफोनधारकांची संख्‍या 264 लाख तर इंटरनेटधारकांची संख्‍या 564 लाख इतकी मोठी आहे.
    दिवसभरात स्‍मार्टफोन युझर्स किती वेळा आणि कोणत्‍या कारणासाठी आपला मोबाईल वापरतात, याचीही पाहणी करण्‍यात आली. या पाहणीनुसार, सर्वसामान्‍य स्‍मार्टफोन युझर दिवसभरात 150 वेळा आपला फोन चेक करतो. त्‍यापैकी 18 वेळा तो वेळ पाण्‍यासाठी तर 23 वेळा तो मेसेज अपडेट करण्‍यासाठी मोबाईल हातात घेतो, असे अहवालात नमूद करण्‍यात आले आहे.
 
Top