न्यूयॉर्क -: गुगल या कंपनीने तयार केलेल्या स्मार्ट चष्म्याबाबत अमेरिकेतील नेत्यांनी माहिती मागविली आहे. लोकांच्या खासगी जीवनाचा सन्मान करण्याबाबत कंपनीने कोणती पावले उचलली आहेत, याची एका पत्राद्वारे विचारणा करण्यात आली. अद्याप हा चष्मा ग्राहकांसाठी तयार झालेला नाही. मात्र या चष्म्यामुळे लोकांची खासगी माहिती सहज मिळवता येऊ शकत असल्याने त्याबाबत वाद निर्माण झाला आहे.
या तंत्रात चष्म्याचा वापर करणारी व्यक्ती जे काही पाहते त्याची सर्व माहिती आकडेवारीच्या स्वरुपात उपलब्ध होते. त्याचा मोठ्याप्रमाणावर वापर होऊ लागला तर लोकांचे खासगी जीवन 'खासगी' राहणार नाही. गुगलने यापूर्वी 'स्ट्रीट व्ह्यू सर्व्हिस' सुरु केली होती. त्यावेळी कंपनीने असुरक्षित वायरलेस नेटवर्कच्या माध्यमातून माहिती गोळा केली होती. त्याबाबत कंपनीला दंडही झाला होता. कंपनीकडून पुन्हा अशी चूक होणार नाही याची खात्री देण्यात यावी, अशी अमेरिकेतील काही नेत्यानी या पत्राद्वारे मागणी केली आहे. गुगल ग्लास हे अनोखे उत्पादन असून अनेक लोक त्याची तुलना 'सिंक्लेयर 5' शी करीत आहेत.