बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: उत्तम प्रशासक म्हणून परिचित असलेल्या जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी वाळू माफियांवर लक्ष केंद्रीत केल्यावर बार्शी तालुक्यातील तत्कालीन तहसिलदार तसेच कर्मचा-यांकडून जाणीवपूर्वक दूर्लक्ष होत असल्याचे व वाळूचा मोठा गोरख धंदा होत असल्याचा पर्दाफाश केला. जिल्हाधिकारी यांनी रस्त्यावर थांबून गाड्या अडविल्या आणि वाहनावर कारवाई करायला भाग पाडल्याने तहसिलचे कर्मचारी उघडे पडले.
सदरच्या प्रकारानंतर बार्शी शहर व तालुक्यातील वाळू माफियांची बैठक झाली व यात काही दिवसांपुरते चार ब्रास ऐवजी दोन ब्रासच वाळू वाहतूक करु असे ठरले. कु-हाडीचा दांडा ठरलेल्या वाळू माफियांनी त्यांच्याच भाऊबंदकीला संपविण्याचा विडा उचलला आणि एक टिम व नेटवर्क तयार करुन त्यांनी स्वतः दुचाकीवर फिरुन वाळूच्या गाड्या शोधण्यास सुरुवात केली. वाळूची गाडी अडवून पोलिसांना आणि महसूल विभागाच्या कर्मचा-यांना त्यांचे क्रमांक त्यांची ठिकाणे इत्यादी माहिती देवून जिल्हाधिकारी यांना फोन करुन सांगतो, असे सातत्याने धमकावत असल्याने त्यांनाही नाईलाजास्तव कारवाई करणे भाग पडते.
मध्यंतरी कारवाई करुन पाच गाड्या पकडल्यानंतर आणखी पाच वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. सदरची वाहने व त्याचे मालक हे बार्शी तालुक्या बाहेरचे असून बार्शी शहरातील वाळू माफिया मात्र मध्यरात्री आपली वाहने गुपचूप आणून ठराविक ठिकाणी साठा करुन दिवसभर छोट्या वाहनातून वाळू वितरीत करीत आहेत. रात्री चो-या करुन दिवसा साजूक सन्याशी असल्यासारखे वावरणादेखील चोर असून त्यांच्यावर देखील लक्ष ठेवून कारवाई करणे गरजेचे आहे. सदरच्या टोळी युध्दाचा भडका उठून काहीजणांचा जीवदेखील जाऊ शकतो. वैरागच्या परिसरातील तलाठी व पोलिसांच्या अंगावर वाळूची गाडी पालथी करुन केलेला प्रकार देखील योच द्योतक आहे.