उस्मानाबाद : तुळजापूर बसस्थानकाच्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी काँग्रेस व राष्ट्रादीची संयुक्त बैठक २९ जून रोजी दुपारी १ वाजता येथील पुजारी मंगल कार्यालयामध्ये होणार आहे.
     बैठकीस पालकमंत्री ा. मधुकरराव चव्हाण, एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, आ. राणाजगजितसिंह पाटील, माजी आ. नरेंद्र बोरगावकर, राकाँ जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, गोकूळ शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश बिराजदार, आप्पासाहेब पाटील यांनी केले आहे.
 
Top