तुळजापूर : बारुळ (ता. तुळजापूर) येथे आजी व नातवाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शेतीच्या वादातुन या दोघांचा खुन झाल्याची चर्चा सध्या ग्रामस्थांमध्ये होत आहे. ही घटना सोमवार दि. 2 जून रोजी रोजी रात्री घडली.
कमलबाई शहाजी शिंदे (वय 55 वर्षे), शहाजी उर्फ संदिप जाधव (वय 18 वर्षे) दोघे रा. बारुळ, ता. तुळजापूर असे संशयस्पदरित्या मृतदेह आढळलेल्या आजी व नातवाचे नाव आहे. यातील कमलाबाई व संदिप हे आजी-नातू सोमवारी दि. 2 जून रोजी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये तानाजी मस्के हा शेताची मशागत करतो की नाही हे पाहण्यासाठी शेतात गेलेले होते. शेतात गेलेले हे दोघेजण रात्री उशीरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी दुस-या दिवशी म्हणजे (दि. ३) जुन रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महादेव कुंडलिक जाधव रा. हिप्परगा हल्ली मुक्काम बारुळ हे शेतात गेले असता शेतात असलेल्या पळसाच्या झाडाच्या आळ्यामध्ये आजी व नातवाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. याबाबत महादेव जाधव यांनी तुळजापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असुन याबाबत अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
आजी व नातवाचा शेतीच्या वादातुन खुन झाल्याची चर्चा सध्या बारुळ ग्रामस्थांमध्ये असुन हा अकस्मात मृत्यू नसुन खुनाचा प्रकार असल्याची चर्चा नागरिकात होत आहे. याबाबतचा अधिक तपास तुळजापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक जाधव हे करीत आहेत