उस्मानाबाद -: विश्ववंद्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त रायगड येथे 6 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या शाही कार्यक्रमात उस्मानाबादच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीला शिवरायांच्या पाहिल्या जयघोषाचा मान मिळाला असल्याची माहिती समितीचे प्रवक्ते जयराज खोचरे यांनी दिली आहे.
6 जून 1674 रोजी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. देशाच्या विशेषत: मराठी माणसाचा खर्या अर्थाने स्वातंत्र्याचा दिवस होता. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समिती, कोल्हापूरच्या वतीने अध्यक्ष युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी युवराज संभाजी महाराजांनी या सोहळ्याप्रसंगी शिवरायांच्या पहिल्या जयघोषाचा मान उस्मानाबादच्या शिवराज्याभिषेक सोहळा समितीला दिला आहे. या सोहळ्यासाठी जिल्ह्यातील शिवभक्तांनी उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन जयराज खोचरे यांनी केले आहे.