बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: नोकरी करुन उपजीविका सांभाळणा-या तरुण महिलेला एकाकी पाहून निर्लज्‍ज तलाठ्याने अडवून विनयभंग केला. सदरच्‍या घटनेची हकिकत एकून तरुणांनी त्‍या तलाठ्याला चोप देवून पोलिसांच्‍या हवाली कले. सदरचा प्रकार रविवारी रात्री घडला. बस स्‍थानकापासून एकाकी महिलेचा पाठलाग करणा-या तलाठ्याचे अनंत नारायण (रा. देशमुख प्‍लॉट, बार्शी) असे नाव असून बार्शी तालुक्‍यातील महागाव येथे तलाठी म्‍हणून काम करत आहे.
    ओळख ना पाळख असलेल्‍या त्‍या तलाठ्याने महिलेचा पाठलाग करुन तुम्‍हाला मी तुमच्‍या घरी सोडतो, माझ्या गाडीवर बसा, असे म्‍हटल्‍यावर घाबरुन जाऊन त्‍या महिलेने लवकर घरी जाण्‍यासाठी भरभर चालत जाण्‍याचा प्रयत्‍न्‍ केला. बेदराई गल्‍लीजवळ आल्‍यावर सदरच्‍या चौकात काही तरुण उभे असल्‍याचे पाहून त्‍या महिलेने थोडासा जीवात जीव आल्‍यासारखे केले व चालण्‍याचा वेग कमी केला. सदरचा प्रकार त्‍या तरुणांना सांगितल्‍याने तरुण सावध झाले. थोडया अंतरावर थांबून महिलेच्‍या सुरक्षेसाठी लक्ष ठेवून उभे असतानाच त्‍या तलाठयाने पाठलाग करीत महिलेच्‍या जवळ येत बस गाडीवर म्‍हणत तिच्‍या ओढणीला हातात धरुन गाडीवर बळजबरीने बसविण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍या तरुणांनी तात्‍काळ हस्‍तक्षेप करुन त्‍या महिलेला त्‍याच्‍या ताब्‍यातून सोडविले. त्‍या तलाठ्याला थोडा प्रसाद देवून पोलिसांच्‍या हवाली केले.
    बार्शी पोलिसात सदरच्‍या अनंत डोके या तलाठ्यावर विनयभंगाचा गुन्‍हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शोभा पडवळ या करीत आहेत.
 
Top