बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील इंडियन रेडक्रॉस सोसायटी उपशाखा बार्शी व उमेद प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2012-13 या सालातील UPSC व MPSC या स्पर्धापरीक्षेतील यशस्वितांच्या सत्कार समारंभ ‘गौरव गुणवंतांचा’ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती इंडियन रेडक्रॉसचे व उमेदचे संचालक अजित कुंकूलोळ यांनी दिली.
माजी खासदार व IAS अधिकारी श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्राचार्य डॉ. अरुण अडसूळ आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांच्या शुभहस्ते होणा-या समारंभात UPSC परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आलेले कौस्तुभ दिवेगांवकर, व MPSC प्रथम आलेले अमित शेंडगे यांच्यासह विजय कुलांगे, हर्षल मेटे,गणेश राख,वैभव अलदर, सुनिल आगवणे, चेतन गिरासे, मनिषा दांडगे,सुधाकर यादव,संजय खरात,नवनाथ माने, अमोल सुर्यवंशी आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी रमेश घोलप (IAS),दिपक शिंदे (IAS),व शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय.यादव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या गुणवंतांच्या गौरव सोहळ्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने रविवार दि. 16/6/2013 रोजी,सायंकाळी 5 वाजता यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन बार्शी येथे आयोजित केलेल्या या सत्कार समारंभास स्पर्धापरीक्षा विद्यार्थी,पालक व नागरिकांनी बहूसंख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन इंडियन रेडक्रॉसचे सचिव डॉ.काका सामनगावकर व उमेदचे अध्यक्ष उमेश घोलप यांनी केले. यावेळी रामचंद्र इकारे,विशाल गायकवाड,सुभाष जवळेकर,कल्याण घळके, अशोक डहाळे आदी उपस्थित होते.