नळदुर्ग -: वागदरी (ता. तळजापूर) येथील काही शेतक-यांना खत व बियाणाचे वाटप त्यांच्या बांधावर करण्यात आले असून शासनाच्या कृषी विभागाने राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथील शेतकरी एकत्र येवून श्री भगवानसिंग महाराज शेतकरी गटाची स्थापना करुन महाराष्ट्र शासनाचे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन उस्मानाबाद कार्यालयाकडे खत व बी-बियाणे मिळावे, याकरीता रितसर रक्कम भरणा करुन मागणी केली होती. शेतकरी गटाच्या मागणीनुसार येथील शेतक-यांना जे.एस. 335 कंपनीचे सोसायबीनचे बियाणे व इफको कंपनीचे डी.ए.पी. खत त्यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यात आले. शासनाच्या या उपक्रमामुळे शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. यामुळे बियाणे व खत विक्री करणा-या खासगी दुकानदारांना जबर हादरा बसला आहे. शेतकरी गटाला बियाणे व खत मिळवून देण्याकरीता गटाचे अध्यक्ष महादेव शंकर बिराजदार व सचिव शंकर तात्याराव धुमाळ यांनी परिश्रम घेतले. कृषी मंडळ नळदुर्ग सर्कलचे कृषी सहाय्यक धनयकुमार बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत गटातील सर्व शेतक-यांना बियाणे व खताचे वाटप करण्यात आले. यावेळी शेतकरी सुभाष सुरवसे, माजी सरपंच विनायकसिंग ठाकूर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.