कळंब -: उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील कळंब व वाशी तालुक्‍यात अपु-या पावसावर अवलंबूनच बळीराजाने पेरणीला सुरुवात केली आहे.
    कळंब तालुक्‍यातील ईटकूर, कोठाळवाडी, खोंदला, आथर्डी, पाथर्डी, गंभीरवाडी या गावच्‍या शिवारात तसेच वाशी तालुक्‍यातील मांडवा, गोजवडा, तांदुळवाडी, लखनगाव, दसमेगांव, झिन्‍नर, पिंपळगाव (लिं), सारोळा, सेलू, पारा आदी गावांच्‍या शिवारात पेरणीला सुरुवात झाली असून केवळ दोन दिवसाच्‍या छोट्या पावसावर भरवसा ठेऊन ही पेरणी शेतक-यांनी केली आहे. खरीप हंगामातील या पेरणीमध्‍ये प्रामुख्‍याने खरीप ज्‍वारी, तूर, सोयाबीन, सुर्यफूल, मका, उडीद या पिकांबरोबर कपाशी लागडवाडीलाही सुरुवात झाली आहे.
    कळंब व वाशी तालुक्‍यात सोयाबीन या नगदी पिकांच्‍या पेरणीवर शेतक-यांनी भर दिला आहे. आणखीन एकही मोठा पाऊस झाला नाही. त्‍यामुळे मोठ्या पावसाची प्रतिक्षा बळीराजाला आहे.
 
Top