तुळजापूर -: ग्रामसेवकाची रोख साडेसतरा हजार रुपयांसह महत्वाच्या कागदपत्रांची बॅग भरदिवसा चोरट्यांनी लंपास केली. ही घटना गुरुवारी दि. 13 जून रोजी तुळजापूर पंचायत समितीसमोर घडली. याप्रकरणी तुळजापूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
ग्रामसेवक निलगार मुरगेअप्पा हे गुरुवारी दुपारी 12.20 वाजेच्या सुमारास पंचायत समिती समोरील ठाकूर यांच्या झेरॉक्स सेंटरवर गेले होते. त्यावेळी निलगार यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास करून विविध कागदपत्रांसह रोख 17 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. भरदिवसा वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. निलगार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.