सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने त्यांच्या गॅलॅक्सी मालिकेतील सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'स्टार' बाजारात आणला आहे. या स्मार्टफोनची किंमत केवळ 5 हजार 240 रुपये आहे.
नोकियाची आशा मालिका आणि मायक्रोमॅक्स व कार्बन या भारतीय कंपन्यांच्या स्मार्ट फोनशी स्पर्धा करण्यासाठी हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या आधी या मालिकेत गॅलॅक्सी वाय सर्वात कमी किमतीचा फोन होता. त्याची किंमत 5 हजार 890 होती.
सॅमसंग कंपनीचा हा नवा फोन ड्युअल सिमचा आहे. यात अँड्राईड 4.1 जेली बीनचा वापर करण्यात आला असून 512 एमबीची रॅम आणि 4 जीबीची स्टोरेज मेमरी आहे. ती 32 जीबीपर्यंत वाढवता येते. गॅलॅक्सी स्टारच्या मागच्या बाजूला दोन मेगापिक्सल कॅमेरा आहे. याचे वजन 110.5 ग्रम आहे. यात 3 इंचाचा टीएफटी स्क्रीन आहे. कनेक्टीविटी ऑपशन्समध्ये वाय फाय आणि 4 ब्लुटूथ यांचा समावेश आहे.