उस्मानाबाद -: लातूर विभागीय मंडळ कक्षेतील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च -2013 परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका व इतर साहित्य वाटप दि.15 जून रोजी 11 ते 5 या वेळेत जि.प.गर्ल्स हायस्कूल,उस्मानाबाद  (उस्मानाबाद,उमरगा तुळजापूर, लोहारा ) आणि  ज्ञानोद्योग विद्यालय,येरमाळा (कळंब,भूम, परंडा व वाशी) या केंद्रावर वितरण करण्यात येणार आहे. तरी माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी  संबंधित केंद्रावरुन विद्यार्थ्यांचे गुणपत्रक  व इतर साहित्य घेऊन जावे, असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी केले आहे.
 
Top