तुळजापूर -: वाहनाच्या पत्र्याला अडकून गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या दरम्यान तुळजापूर येथील उध्दवराव पाटील सभागृहासमोर घडली आहे.
वेणाराम जेटाजी भाटी असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. यातील वेणाराम भाटी हे तुळजापूर बसस्थानकासमोरील स्वीटमार्टचे चालक असून ते खुर्द येथून दुचाकीवरुन तुळजापूरकडे येत असताना उध्दवराव पाटील सभागृहासमोर पत्रे वाहतूक करणार्या वाहनाशी धडक बसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.