बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील कवि कालिदास मंडळातर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेकरीता कविता पाठविण्याचे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुमन चंद्रशेखर यांनी केले आहे.
    कवि कालिदास मंडळाच्यावतीने प्रत्येक वर्षी आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवशी कालिदास महोत्सवाचे आयोजन केले जाते. यावर्षीचा कालिदास महोत्सव दि. 14 जुलै रोजी बार्शी येथील सुलाखे हायस्कूलच्या शिशू विहार हॉलमध्ये होत असून सहभाग घेणा-या कवींनी आपल्या दोन कविता कवि दत्ता गोसावी, काव्यकृपा, व्हनकळस प्लॉट, अलीपूर रोड, बार्शी या पत्त्यावर पाठवाव्यात. विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानपत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी 9881708198 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
 
Top