बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: शिवराज्‍य सेनेच्‍यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या 340 व्‍या शिवराज्‍याभिषेक दिनानिमित्‍त जवाहर हॉस्पिटल जवळ असलेल्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अर्धपुतळ्या दूध, तूप, मध, गुलाब पानी याद्वारे अभिषेक करण्‍यात आला.
    कार्यक्रमाच्‍या सुरुवातीस ढोल ताशाच्‍या गजरात भव्‍य मोटार सायकल रॅली काढत छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्‍पहार अर्पण करुन बुंदीचे लाडू व मिठाई वाटप करण्‍यात आली. यानंतर अर्धाकृती पुतळ्यास अभिषेक करण्‍यात आला. यावेळी 151 लिटर मसाला दूध वाटप करण्‍यात आले. यावेळी शिवभक्‍त मोठ्या संख्‍येनी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना शिवराज्‍य सेनेचे अध्‍यक्ष हर्षवर्धन पाटील म्‍हणाले, शेकडो वर्षाच्‍या गुलामगिरीतून महाराष्‍ट्राला छ्त्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्‍या मावळ्यांना एकत्र करुन अखंड हिंदवी स्‍वराज्‍याची स्‍थापना केले. दि. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी महाराजांचा अभिषेक होवून पहिला हिंदू पतपातशाह निर्माण झाला. यावेळी प्रा. बप्‍पा जगदाळे यांनी शिवभक्‍तांना मार्गदर्शन केले.
    कार्यक्रमाच्‍या यशस्‍वीतेसाठी युवराज ढगे, अमोल डिसले, शिरीष जाधव, सागर डुरे, धनराज सुतार, बालाजी ढगे, निलेश पवार, बापू कुलकर्णी, पंत बारंगुळे, गणेश जाधव, राम बेले, प्रितम मोरे, महेंद्र मोरे, महेंद्र देवकर यासह शिवराज्‍य सेनेच्‍या सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन स‍ंदिर मिरगणे यांनी केले. सचिन मुकटे यांनी मान्‍यवरांचे आभार मानले.
 
Top