उस्मानाबाद : जिल्ह्यातील जे भाविक उत्तराखंड येथे गेले आहेत, त्यांच्या कुटूंबियांनी अथवा नातेवाईकांनी त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्यावी. जिल्हा प्रशासनामार्फत त्यासाठी संपर्क कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून देहरादून येथील संपर्क कक्षाशीही जिल्हा प्रशासनामार्फत संपर्क साधून माहिती घेतली जात असल्याचे जिल्हाधिकारी ज्ञानोबा फुलारी यांनी कळविले आहे.
      संपर्क कक्षाचे दूरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत.- जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद- ०२४७२-२२४५०१, अपर जिल्हाधिकारी- २२७३०३, निवासी उपजिल्हाधिकारी-२२७३०, तहसीलदार, उस्मानाबाद-२२७८८३. याशिवाय, जिल्हाधिकारी श्री. फुलारी (मो.क्र. ९४२३०७६२४७), निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड (९४२२७१३७५६), तहसीलदार सुभाष काकडे (९४२३१७०५७७) यांच्याशी थेट संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
          जिल्हा प्रशासनामार्फत उत्तराखंड प्रशासनाशी तसेच महाराष्ट्र शासनाने तेथे स्थापन केलेल्या मदत कक्षाशी संपर्क साधून माहिती घेतली जात आहे. ज्या नागरिकांचा त्यांच्या उत्तराखंड येथे गेलेल्या नातेवाईकांशी अथवा कुटुंबियांशी संपर्क झाला असेल, त्यांनीही त्याबाबतची माहिती द्यावी. तसेच ज्या प्रवासी कंपन्यामार्फत याठिकाणी पर्यटन सहलींचे आयोजन करण्यात आले होते, त्यांनीही प्रवासी भाविकांची-पर्यटकांची माहिती जिल्हा प्रशासनाला द्यावी, जेणेकरुन समन्वय साधून संपर्क करणे आणि त्यांना मदत करणे सुलभ होऊ शकेल, असे जिल्हाधिकारी फुलारी यांनी कळविले आहे. 
 
Top