उस्मानाबाद -: जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने माजी सैनिक, दिवंगत सैनिकांच्या पत्नी तसेच अवलंबितांसाठी कल्याण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या जिल्हा पूर्नवसन अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  निवृत्त मेजर सुभाष सासने, पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण भांगे, ई.सी.एच.एस.चे श्री.देशमुख, एस.जी.बिराजदार, कल्याण संघटक एस.डी.होमकर यांच्यासह माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
     यावेळी मेजर सासने म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून  मोलाचे सहकार्य मिळत असल्याने माजी सैनिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मदत मिळते. माजी सैनिक/विधवा/अवलंबितांचे प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्र सरकार व महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत राबविण्यात येणा-या योजनांची माहिती यावेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली. 
     माजी सैनिकांनी तंदुरुस्त राहण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे देशमुख यांनी सांगितले. स्मार्ट कार्ड तसेच विशेष कार्डही माजी सैनिकांनी काढावे, अशी सूचना त्यांनी केली. माजी सैनिकांनी रुग्णालयाबाबत मांडलेल्या प्रश्नांचेही त्यांनी यावेळी निराकरण केले.
      या मेळाव्यात माजी सैनिकांनी मांडलेल्या सूचना व अडीअडचणीचे निराकरण दरमहा बैठका घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सुर्यवंशी यांनी सांगितले. 
      हा मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा सैनिक कलयाण कार्यालयाचे अधिकारी व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
 
Top