उस्‍मानाबाद -: पिस्‍टल व काडतुसे याची बेकायदेशीररित्‍या येडशी (ता. उस्‍मानाबाद) येथे विक्री करीत असताना पोलिसांनी सापळा रचून दोन इसमांना ताब्‍यात घेवून गजाआड केले. ही घटना आज शनिवार दि. 29 जून रोजी घडली असून ही कारवाई दरोडा प्रतिबंधक पथकाने केली आहे.
    प्रतीक मधुकर चौधरी (रा. येडशी, ता. उस्‍मानाबाद), बाबुराव विठोबा भोसकर (रा. सापनाई, ता. कळंब) असे अटक करण्‍यात आरोपींचे नाव आहे. दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस कर्मचारी गुन्‍ह्यातील मालाचा शोध घेत असताना एका गुप्‍त खब-यामार्फत माहिती मिळाली की, येडशी येथील राहणारे दोन इसमांनी कोठून तरी पिस्‍टल व त्‍याचे काडतूस आणलेली आहेत व ते विक्री करण्‍यासाठी येडशी चौकात थांबले असल्‍याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली असता, वरील आरोपींना ताब्‍यात घेवून त्‍यांची झडती घेतली. यावेळी बाबुराव भोसकर यांच्‍या कंबरेस खोवलेली एक देशी बनावटीचे पिस्‍टल व पाच काडतुसे मॅगझीनसह मिळून आले. त्‍यांच्‍याकडे पिस्‍टलबाबत विचारपुस केली असता, त्‍यांच्‍याकडे पिस्‍टणे बाळगणेबाबत कोणताही परवाना (लायसन्‍स) नसल्‍याचे सांगून उडवाउडवीचे उत्‍तरे त्‍यांनी दिली. त्‍यावरुन त्‍याना ताब्‍यात घेवून उस्‍मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्‍यात आर्म अँक्‍ट कलम 3, 5/25 व जमाब बंदी कायदा कलम मु.पो.का. 135 प्रमाणे गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
 
Top